पुण्यातील पुरस्थितीवर शिंदे मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना थेट सूचना
Pune Rains Flood Like Situation : जवळपास ३ लाख घरं ही निळ्या पूररेषेत असल्याची माहिती पुणे आयुक्तांना एकनाथ शिंदे यांना दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे.
पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. निळ्या पूररेषेतील घरांचं कारयमस्वरूपी स्थलांतर करता येईल का? असा सवाल करत स्थलांतराचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करा, अशा थेट सूचनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. जवळपास ३ लाख घरं ही निळ्या पूररेषेत असल्याची माहिती पुणे आयुक्तांना एकनाथ शिंदे यांना दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकानथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

