मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नीनं धरला ऑर्केस्ट्राच्या तालावर ठेका, बघा जबरदस्त डान्स
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा, पत्नी लताताई शिंदे यांनीही केला सेलिब्रेशनमध्ये भन्नाट डान्स, बघा व्हिडीओ
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रवारी रोजी साजरा झाला. त्यानिमित्ताने संपूर्ण ठाण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. ठाणेपासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला. अनेक कार्यकर्ते, नेते आणि राजकीय नेते मंडळींनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मग या आनंदाच्या क्षणी कुटुंब तरी कसे मागे राहणार? मुख्यमंत्र्यांची पत्नी लताताई शिंदे यांनीही वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये भन्नाट डान्स केला. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 22 नंबर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे देखील उपस्थित असताना ऑर्केस्ट्राच्या तालावर त्यांनी ठेका धरला.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

