सरकार ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पुन्हा अॅडवान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा अॅडवान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं.
दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली. महिलांना अॅडवान्समध्ये पैसे देण्याचीही दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे ३ हजार, सप्टेंबरचे १५०० आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ३ हजार असे एकूण ७५०० रूपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत २ हजार ४०० महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली. मतदार तुमचा गाशा गुंडाळणार आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले. बघा स्पेशल रिपोर्ट
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

