VIDEO : राज ठाकरे म्हणतात मी मास्क वापरत नाहीत, उद्धव ठाकरे म्हणतात…

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. (Uddhav Thackeray on raj thackeray face mask)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:38 PM, 2 Mar 2021

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले. (CM Uddhav Thackeray reaction on raj thackeray not wearing a face mask)