AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!

Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!

| Updated on: Jun 16, 2026 | 9:50 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे.

केंद्र सरकारकडून घेतलेल्या निर्णयांनंतर पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये याआधीही वाढ नोंदवण्यात आली असून आता सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांनाही पुन्हा एकदा दरवाढीचा फटका बसला आहे. सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. प्रति किलो सीएनजीच्या किमतीत वाढ होऊन आता दर 95.75 रुपये इतका झाला आहे. यापूर्वी 8 मे रोजी दीड रुपयांनी तर 28 मे रोजी अडीच रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती.

तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरातही 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे पीएनजीचा नवीन दर 51.50 रुपये प्रति मानक घनमीटर इतका झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरात ही दरवाढ लागू करण्यात आली असून यामुळे वाहनचालक आणि घरगुती ग्राहकांवर आर्थिक भार वाढणार आहे.

दरम्यान, सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळा सहन करत असून पुढील काळात दर स्थिर होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 16, 2026 09:50 AM

Follow Us