गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर अंजली दमानियांचा संताप, आता थेट…
बीडमधील एका व्हिडीओवरून राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडे यांनी थांबवल्याने हा विषय चर्चेत आला. त्यानंतर काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधण्यात आल्याने वाद आणखी वाढला आहे.

काँग्रेसच्या या टीकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दांचा दमानिया यांनी निषेध केला. त्यांनी स्पष्ट शब्दात अशा वागणूकीचा आणि मानसिकतेचा विरोध केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, ‘गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते’.
Published on: Aug 04, 2026 01:34 PM
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर...
ब्लॅकलिस्ट कंपनीकडे परीक्षा नियोजन? पवारांनी उघड केली धक्कादायक...
तामिळनाडूत मोठी खळबळ! भर मंचावरून अभिनेत्री तृषा कृष्णबद्दल डबल मिनिंग
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय