मोदींनी Congress च्या राज्यांवरील अत्याचारांचा पाढाच वाचला! | PM Modi at RajyaSabha
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विशेषतः शरद पवारांचे कौतुक करत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विशेषतः शरद पवारांचे कौतुक करत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? अशा सवालांच्या फैरीच त्यांनी झाडल्या. विरोधक नेहमी इतिहास बदलण्याचे आरोप करतात. त्याल्याही त्यांनी उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव येणारच, असे हसत-हसत सांगितले.
Published on: Feb 08, 2022 02:24 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

