Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
महाराष्ट्र काँग्रेसमधील संघटनात्मक नियुक्त्यांवरून सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधातील तक्रारींची काँग्रेस हायकमांडने दखल घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये तातडीने कोणताही बदल करण्यास हायकमांडने स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संघटन सृजन मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या काही नियुक्त्यांबाबत पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विदर्भातील एका खासदारासह एका आमदारानेही हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केल्याची चर्चा आहे.
या तक्रारींची दखल घेतल्यानंतर काँग्रेस हायकमांडने परिस्थितीचा आढावा घेतला असून, सध्याच्या जिल्हाध्यक्षांना काम करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी दिला जावा, अशी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे तत्काळ बदल करण्याऐवजी संघटनात्मक कामगिरीचे मूल्यांकन करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, पक्षातील अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक बदलांच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात हायकमांडच्या भूमिकेकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हास्तरावरील संघटन बळकट करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी देण्याच्या भूमिकेवर हायकमांड ठाम असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Jun 13, 2026 01:33 PM
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...