Beed Murder:’मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे…,’ काय म्हणाले विजय वडेट्टीवार
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास महिना होत आला तर तीन फरार आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्नाटक सीमेवर तिघा अज्ञातांचे मृतदेह सापडल्याचा आपल्याला कॉल आल्याचा दावा केला आहे. त्यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येनंतर बीडमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात प्रमुख आरोपीला अटक करण्याची मागणी सर्वांनी केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या दरम्यान, कर्नाटक सीमेवर तिघा अज्ञातांचा मृतदेह सापडल्याचा आपल्या फोन आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. हे कॉल डिटेल्स आपण पोलिसांना दिलेले असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. संदर्भात बदलापूर बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला, तसेच बीड प्रकरणात देखीस मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी मोहरे गायब केले जाऊ शकतात, अंजली दमानिया यांच्या दाव्यात तथ्य असू शकते असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

