हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला. अशातच काँग्रेस आमदारानं खळबळजनक वक्तव्य केले आहे.
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे आजपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला. अशातच काँग्रेस आमदारानं खळबळजनक वक्तव्य केले आहे. मी पण एक बॉम्ब आणलाय, अधिवेशनात बॉम्ब फोडणार असं मोठं वक्तव्य करत या आमदारानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तर उद्यापर्यंत शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे पोलखोल करणार असल्याचा इशारा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला असून मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारी ते असल्याचे दिसतेय. जेव्हापासून शिंदे सरकार स्थापन झालं तेव्हापासून महाराष्ट्राला पनवतीच लागली आहे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. तर जनता, शेतकरी या सरकारच्या भरोसे राहणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अब्बा छब्बा आणि डब्बाचं हे सरकार असून तीन पक्षांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे.
Published on: Dec 07, 2023 04:45 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
