भाजप बहुजन चेहरे वापरुन बाजूला करतो, भाजप हा बहुजन विरोधी पक्ष, नाना पटोलेंचा आरोप
भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला.
भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीदेखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

