Nagpur | नागपुरात काँग्रेसचा स्वबळाचा नारा? नाना पटोले आज मुंबईत बैठक घेणार

नागपूरात काँग्रेस स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीसोबत? याचा फैसला आज होणार आहे. मुंबईत होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.  नागपूर महानगरपालिका निवडणूकीबाबत आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आहे. 

नागपूरात काँग्रेस स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीसोबत? याचा फैसला आज होणार आहे. मुंबईत होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.  नागपूर महानगरपालिका निवडणूकीबाबत आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आहे.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत बैठक घेणार असून काँग्रेसचे नागपूरमधील महत्त्वाचे नेते  यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  बैठकीत नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असतील. काँग्रेस  नागपूर महानगरपालिका निवडणूकीची रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI