मुंबई लोकसभेच्या जागांवरून ठाकरे अन् काँग्रेसमध्ये खटके, जागा वाटपाच्या तिढ्यात देवरांची एन्ट्री
मुंबईतील जागांवर ठाकरे गटाचा दावा कायम आहे. इतक्या दिवसांपासून शांत असलेल्या देवरा यांनी आता जागा वाटपाच्या तिढ्यात एन्ट्री घेतली आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई अशा मुंबईत लोकसभेच्या एकूण ४ जागा आहेत. कोणत्या जागेवर कुणी सांगितला दावा?
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : मुंबईतील लोकसभा जागांच्या वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता खटके उडू लागलेत. अधिकृत जागा वाटप होत नाही तोपर्यंत दावे करू नका, असा इशारा काँग्रेस नेते मिलींद देवरा यांनी दिलाय. मुंबईत जागावाटपावरून मविआत खटके उडण्याचा सिलसिला कायम आहे. मुंबईतील जागांवर ठाकरे गटाचा दावा कायम आहे. इतक्या दिवसांपासून शांत असलेल्या देवरा यांनी आता जागा वाटपाच्या तिढ्यात एन्ट्री घेतली आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई अशा मुंबईत लोकसभेच्या एकूण ४ जागा आहेत. याचारही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा सांगितलाय. तर दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन्ही जागांवर काँग्रेसनं दावा सांगितला. दरम्यान, सुरू असलेल्या लोकसभा जागावाटपांच्या दाव्याच्या तिढ्यात आता मिलींद देवरा यांनी उडी घेतली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट, काय म्हणाले नेमकं देवरा?
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

