केंद्रातील भाजप मोहलाई, शिवसेनेवर आक्रमण केलं; राऊत यांचा घणाघात
राऊत यांनी, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची गुढी शिवसेनेला आहे. याच शिवसेनेला संपवायचे काम केंद्रातील भाजपने केल्याचं म्हटलं आहे
मुंबई : कोरोनाच्या काळानंतर राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच दिंवगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभे गट पडले आणि शिवसेना शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत यावरून भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका करत असतात. आताही त्यांनी केंद्रातील भाजपवर निशाना साधला आहे.
राऊत यांनी, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची गुढी शिवसेनेला आहे. याच शिवसेनेला संपवायचे काम केंद्रातील भाजपने केल्याचं म्हटलं आहे. यावरच राज्याची जनता नाराज आहे. येत्या काही दिवसांत किंवा या वर्षभरात महाराष्ट्रात हा स्वाभिमान, महाराष्ट्राची गुढी शिवसेने पुन्हा एकदा घराघरावर दिसेल असा विश्वास ही त्यांनी दाखवला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
