Breaking | द.आफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 जण कोरोनाबाधित
ओमिक्रॉन हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तातडीने पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे दोन गटात वाटप केले आहे. जिल्हा निहाय त्याची वर्गवारी केली आहे. आतापर्यंत सहा प्रवासी दक्षिण आफ्रिका, नायजेरीया आणि झांबियातून आले आहेत.
पुणे: राज्यातील जनतेच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तातडीने पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे दोन गटात वाटप केले आहे. जिल्हा निहाय त्याची वर्गवारी केली आहे. आतापर्यंत सहा प्रवासी दक्षिण आफ्रिका, नायजेरीया आणि झांबियातून आले आहेत. ते पॉझिटीव्ह आले आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
