राज्यपालांच्या कृतीबाबत कोर्टात भाष्य नाही: उज्ज्वल निकम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात त्रिसदस्यीय पीठापुढे आज सुनावणी झाली.
“आज जे अपेक्षित होतं, विशेषत: राज्यघटनेच्या संदर्भात कोणाचं कृत्य घटनाबाह्य होतं यावर भाष्य अपेक्षित होतं, तसं काही घडलं नाही. परंतु, बहुमत व्यक्त करणं, अंतर्गत बहुमत व्यक्त करणं अशा प्रकारचा युक्तीवाद आज सर्वोच्च न्यायालयात झाला,” अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात त्रिसदस्यीय पीठापुढे आज सुनावणी झाली. आपण शिवसेना सोडली नसल्याचा शिंदे गटाचा दावा असून 40 आमदारांना 15 आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे.
Published on: Aug 03, 2022 02:32 PM
Latest Videos
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता

