Kishori Pednekar : मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, पेडणेकरांची माहिती
COVID death in Mumbai : मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना दिली आहे.
मुंबईत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. महापालिकेचं आरोग्य विभाग झोपलेलं आहे का? असा सवाल देखील पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यातून कोरोना हद्दपार झालेला आहे. मात्र आज परळमधील एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आज याठिकाणी रुग्णालय प्रशासनापैकी कोणीही हजर नाही. पालिकेचं आरोग्य विभाग हे झोपलेलं आहे. ही बातमी उद्धव ठाकरे यांना कळताच त्यांनी मला आणि अनिल कोकीळ यांना फोन करून याठिकाणी पाठवलं. याबाबत राज्य सरकारने जागृत होणं गरजेचं आहे, असं पेडणेकर यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

