Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात; जबाबदाऱ्यांचे वाटप
Thackeray Group Election Strategy : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. नेते, उपनेते आणि राज्य संघटकांवर ठाकरे गटकडून जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या आहे. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. 19 जूनपर्यंत स्थानिक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
यात सुभाष देसाई, राजन विचारे यांच्यावर ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदरची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर संजय राऊत यांच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहराची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनिल परब, संजय राऊत धुळे आणि अहिल्यानगर, अनिल परब कल्याण-डोंबिवली, भास्कर जाधव नागपूर, चंद्रपूर, अनंत गीते यांच्याकडे उल्हासनगर, पनवेल शहर, अरविंद सावंत यांच्याकडे अमरावती अकोला, विनायक राऊत यांच्याकडे वसई-विरार शहर, भिवंडी, निजामपूर शहर, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आलेली आहे.