ग्राहकांना दुचाकीसह आता द्यावे लागणार दोन हेल्मेट
ग्राहकांना दुचाकी खरेदी करताना आता दोन हेल्मेट द्यावेत, अशा सूचना वाहतूक विभागाकडून दुचाकी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट मिळणार आहेत.
मुंबईमध्ये दुचाकीवर असणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट द्यावेत, अशा सूचना वाहतूक विभागाकडून दुचाकी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार बाईक खरेदी करणाऱ्यांना दुचाकी विक्रेत्यांकडून दोन हेल्मेट दिले जाणार आहेत.
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

