Tv9 Marathi Special Report । 3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
पुणे जिल्ह्यातील दौंड येथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नसबंदी शस्त्रक्रियेनंतर रंजना केसकर यांना प्रकृती बिघडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्याच्या ससून येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात संबंधित शस्त्रक्रिया साताऱ्याहून आलेले शल्यचिकित्सक सर्जन अनिल कदम यांनी केली होती. विशेष म्हणजे, त्या दिवशी त्यांनी एकूण 97 शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, दोन दिवसांत अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र सरकारी सर्जन उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच डॉक्टरला सातारा, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याचे समजते.
ws
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....

