Ajit Pawar मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर होते? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण, म्हणाले…
VIDEO | गणेशोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील अजितदादा उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चां होत्या. यावर छगन भुजबळ म्हणाले...
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित दादा नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशातच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, अजितदादांना थ्रोट इंफेक्शन झालंय त्यामुळे ते कॅबिनेटला आले नाहीत. तरीसुद्धा आमची बैठक आहे, ती होणार आहे, बैठक अगोदरच ठरलेली होती. तर कॅबिनेटला अजितदादा येणार नाहीत हे मला सांगितलं होतं, आता प्रफुल पटेल या बैठकीचं नेतृत्त्व करतील, अशी माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे. थ्रोट इंफेक्शनमुळे ते देवगिरीतून मंत्रालयापर्यंतही येऊ शकले नाहीत. हे राजकीय आजारपण नाही. दादांना कधी राजकीय आजारपण होऊच शकत नाही, असेही भुजबळ म्हणाले.