‘एक मिनिट… मी बांधिल नाही, कुठेही बाईट…’; पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न अन् दादा भडकले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे माध्यमांच्या काही प्रतिनिधींवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे काहीवेळा सभेतील भाषणं, प्रतिक्रिया देताना कित्येकदा मश्कील वक्तव्य आणि विनोदी भाष्य करत असताना मात्र आज ते पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.
पत्रकारांनी अजित पवार यांना त्यांनी बारामती विधानसभेतून लढण्यास रस नाही अशा केलेल्या वक्तव्यावर सवाल केला. मात्र हे काही अजित पवार यांना आवडलं नसल्याने दादा पत्रकारांवर भडकले. ‘मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठेही बाईट देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बाईट द्यायला मी बांधिल नाही ‘, असे अजित पवार रागात म्हणाले आणि तिथून निघून गेलेत. अजित पवार यांनी बारामतीत लढण्यास रस नसल्याचे म्हणत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिलेत. यावरच पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला. त्यावर अजितदादा म्हणाले की, काम मी बघितलं आहे, तुम्ही काहीही प्रश्न विचारता. अमुक-अमुक व्यक्ती बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छूक आहे का, असं तुम्ही विचारलं होतं. त्यावर मी म्हटलं की, लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तुम्हीही लढवू शकता, पण तुम्ही यावर बातमी काय चालवली?
Published on: Aug 16, 2024 02:45 PM
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
