Ajit Pawar : बारामतीत कहर, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, अजित पवारांचा पहाटेपासूनच पहाणी दौरा सुरू
बारामतीत अतिवृष्टी झाली असल्याने मोठं नुकसान बारामतीचं झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार यांच्याकडून यासंदर्भातील पहाणी करण्यात येत आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलेच झोडपून काढले आहे. मे महिन्यातच पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. अशातच बारामतीमध्ये देखील अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळाला. बारामतीत अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. बारामतीत झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा पहाटेपासूनच अजित पवार यांनी सुरू केला आहे. अतिवृष्टीमुळे नीरा-डावा कालवा फुटला आहे. या ठिकाणी देखील अजित पवार यांनी पाहणी केली आहे. दरम्यान, बारामतीत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही इमारतींना तडे गेले आहे. अजून पावसाळा सुरू झाला नसता तरी सुरूवातीच्या काळातच मोठं नुकसान झालं आहे. यासंपूर्ण परिस्थिती आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जात आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

