Ajit Pawar : दादांना आवडे स्वच्छता… एका कार्यक्रमात अजित पवारांनी स्वतःच्या हातानं पुसला सोफा, व्हिडीओ व्हायरल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात स्वतः सोफा पुसला आहे. शिरुरच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यातील हा व्हिडिओ असून सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्याने अजित पवार यांनी स्वतः आपल्या हाताने तो स्वच्छ केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, अजित पवार जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा तिथं बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोफ्यांवर धुळ बसली होती. त्यामुळे सोफ्यावर बसण्याआधी अजित पवारांनी स्वतः सोफा स्वच्छ केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि मिश्कील वक्तव्यामुळे चर्चेत असतात आज त्यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे.