अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र ‘या’ कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
दिल्लीत CJP आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २० हून अधिक FIR दाखल झाले आहेत. पोलिसांनी सात हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. २0 हून अधिक एफआयआर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. CJP च्या तीन प्रमुख नेत्यांना २४ तासांनंतर जामिनावर सोडण्यात आले.
दिल्लीत CJP च्या वतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत २० हून अधिक प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र कोणताच ठोस मुद्दा नाही तसेच अटी मान्य केल्यामुळे त्यांना जामिन देण्यात आला. त्यांच्यावर दिल्लीत वावरण्यावरून अटी- शर्ती आहेत. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले होते, ही संख्या आता हजारांच्या वर गेली असल्याची माहिती मिळत आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेले CJP चे तीन प्रमुख नेते – अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास – यांची २४ तासांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका झाली. मुंबई-दिल्ली विमानातून त्यांना सकाळीच ताब्यात घेण्यात आले होते. जामिनावर सुटका झाल्यानंतरही त्यांनी माध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे त्यांच्या जामिनावर काही अटी असू शकतात अशी चर्चा आहे. त्यांची पुढील रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Published on: Oct 11, 2026 11:30 AM
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...

