Raosaheb Danve | अमित शाहा यांच्याशी राज्यातल्या साखर कारखान्याच्या अडचणीबाबत चर्चा : रावसाहेब दानवे

अमित शाहांसोबतची बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून सहकारी साखर कारखान्यांसाठी एक नवसंजीवनी मिळेल असा दावा फडणवीस यांनी या बैठकीनंतर केलाय.

सहकार क्षेत्र आणि सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून सहकारी साखर कारखान्यांसाठी एक नवसंजीवनी मिळेल असा दावा फडणवीस यांनी या बैठकीनंतर केलाय. त्याचबरोबर फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत दूजाभाव केला जात असल्याचा आरोपही केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI