मुख्यमंत्री फडणवीसच? दिल्लीत फैसला पण शंभूराज देसाई अन् चंद्रकांत दादांचा सूर वेगळा?
दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र त्याआधी शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यासाठी दिल्लीतील बैठकी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. मात्र त्यापूर्वीच शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न झाल. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांची नावावर मोहोर लागल्याची माहिती आहे. बैठकीची फक्त औपचारिकता बाकी असताना शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावी, ही आपलेपणाची भावना असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. तर राजस्थान आणि मध्यप्रदेश सारखा प्रयोग होणार का? याची माहिती नसल्याचे म्हणाले आणि भुवया उंचावल्यात. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असल्याचे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. मात्र आरक्षणाचा विषय काढून शंभूराज देसाई यांनी मराठा कार्ड पुढे केलं. तर चंद्रकांत पाटील यांनी भाजपने राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना दिलेल्या धक्क्याची आठवण करून दिली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…