Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला
महाराष्ट्रात नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निकालात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाली असली तर भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय.
दिल्ली : महाराष्ट्रात नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निकालात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाली असली तर भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यातील सर्वाधिक 27 नगर पंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपच्या ताब्यात 22 नगर पंचायती आल्या आहेत. तर 21 नगर पंचायतीसह काँग्रेस तिसऱ्या आणि 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

