बीडच्या आष्टीत मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धसांनी गाजवलं भाषण अन् पंकजा मुंडेंनी लगावला टोला
बीडच्या आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपसा सिंचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच तुफान फटकेबाजी केली. मेरे पास देवेंद्र फडणवीस साहब का आशीर्वाद है.. असं म्हणत धसांनी फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला.
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी या मतदारसंघात कार्यक्रम उपसा सिंचन प्रकल्प योजनेचा होता, पण डायलॉगबाजी दिवारपासून ते बाहुबलीपर्यंत झाली. पंकजा मुंडे यांच्यासमोरच सुरेश धसांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद है.. असं म्हटलं आहे. नेहमीप्रमाणे सुरेश धसांनी आष्टीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपलं भाषण चांगलंच गाजवलं. इतकंच नाहीतर फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. तर देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणणारे मला शिवगामी म्हणायचे असा टोला पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांना लगावला. बाहुबली आणि शिवगामीची उपमा झाल्यानंतर सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात देवेंद्र फडणवीस यांचा लाडका किंवा लाडकी सांगण्यावरूनही स्पर्धा रंगली. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधात काम केल्याचे आरोप सुरेश धसांनी केला. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाव न घेता सुरेश धसांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावलाच. ‘मी जिवंत राहील नाही राहिल पण आष्टीत भाजपचाच आमदार राहिल’, असा विश्वास सुरेश धसांनी व्यक्त केला. बघा सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचे भाषणातून वार-पलटवार

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
