Pankaja Munde Viedeo : ‘फडणवीसांना बाहुबली म्हणणारे, मला शिवगामी म्हणायचे पण मेरा वचनही…’, पंकजा मुंडेंकडून धसांचा समाचार
फडणवीसांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्वभाव आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. तसेच सुरेश धसांच्या टोल्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवारही केला.
बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच यातील बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या तुफान भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी तोडीसतोड भाषण करत त्यांचा खरपूस समाचार घेतला. बीड जिल्ह्याचे आणि देवेंद्र फडणवीसांचे स्पेशल रिलेशन सांगताना एक किस्सा सांगितला. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘देवेंद्रजी तुम्ही जेव्हा सीएम म्हणून बाहुबली म्हणतात. तुम्ही ज्येष्ठ आहात. नेते आहात. तुम्ही कॅबिनेटचे प्रमुख आहात. तुमच्या विषयी आदरभाव नेहमी येतो. पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते. शिवगामी ही बाहुबलीची आई आहे. त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा तुम्ही जसे पिक्चर म्हणता. आम्हीही पिक्चरचे वाक्य म्हणतो. शिवगामीणीचं वाक्य असतं, मेरा वचनही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धस यांना दिलंय. तेच माझं शासन आहे. गोपिनाथ मुंडेची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बघा संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक

'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला

'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा

आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
