AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले होय आम्ही मित्रपक्ष...; चर्चेला उधाण!

पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले होय आम्ही मित्रपक्ष…; चर्चेला उधाण!

| Updated on: May 17, 2026 | 6:18 PM
Share

आज पुण्यातील कृषी महाविद्यालयातील सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हॅकॅथॉन २०२६ पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तसेच कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती दिली. दरम्यान, त्यांना पार्थ पवारांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं.

यावेळी ते म्हणाले, “आम्ही एकत्र आहोत.” म्हणजेच राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष आणि भाजप हे मित्र पक्ष असल्यामुळे भेटीगाठी होणं काही विशेष नाही. याची बातमी करण्याची गरज नाही, मित्र पक्ष भेटतातच. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या वेळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर पार्थ पवारांशी चर्चा झाली. प्रशासकीय आणि राजकीय विषयांवर बोलणं झालं.” कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले की, ‘अजित दादा पवार आपल्यामध्ये नाहीत, शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालासा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्री यांची भूमिका आहे.

Published on: May 17, 2026 06:17 PM
Follow Us