मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त सवालानं खळबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दुचाकीवरून विधान भवन गाठत सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्वतः ‘रॉयल एनफिल्ड 350’ चालवत विधान भवनात पोहोचले. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला ताफाही दुचाकींवर दिसला.

मात्र, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संबंधित बुलेटची कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करत वाहनाचे पीयूसी कालबाह्य झाल्याचा दावा केला. त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्टीकरण दिले. सर्व्हर बंद असल्यामुळे प्रमाणपत्र अपडेट झाले नव्हते, मात्र वाहनाचे सर्व तपासणी काम पूर्ण झाले होते, असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसने चुकीची माहिती पसरवू नये, असेही त्यांनी म्हटले.
Published on: May 14, 2026 06:16 PM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच