…अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, Devendra Fadnavis यांचं शिवसेनेवर टिकास्त्र

शिवसेना सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठं रान उठवलेलं आहे. शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं असं भाजप नेते सतत म्हणत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेवर टीकेचे असूड ओढले आहेत.

शिवसेना सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठं रान उठवलेलं आहे. शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं असं भाजप नेते सतत म्हणत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेवर टीकेचे असूड ओढले आहेत. शिवसेना सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफ़ी मागायला आम्ही सावरकर आहोत का असे शिवसेना सदस्य म्हणतात, हा निर्लज्जपणा आहे. शिवसेना सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर

तसेच पुढे बोलताना आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा आहेतच. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? अशी भावान फडणवीस यांनी व्यक्त केली.

Published On - 4:31 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI