AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : दादरच्या इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची धनंजय मुंडेंकडून पाहणी

Video : दादरच्या इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची धनंजय मुंडेंकडून पाहणी

| Updated on: May 11, 2022 | 4:06 PM
Share

दादरच्या इंदू मिलमधील (indu mill) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकर स्मारकाची डेडलाईनही दिली. 2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत या प्रकल्पावर 245 कोटी रुपये खर्च झाले […]

दादरच्या इंदू मिलमधील (indu mill) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकर स्मारकाची डेडलाईनही दिली. 2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत या प्रकल्पावर 245 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी या वर्षी आपण या प्रकल्पासाठी ठेवला आहे. या प्रकल्पासाठी या वर्षी 300 कोटी रुपये खर्च झाला. त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकची वाट संपूर्ण देश पाहतोय, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मुंडे यांच्या सोबत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि या प्रकल्पाशी संबंधित अधिकारीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधितांना काही सूचनाही केल्या.

Published on: May 11, 2022 04:06 PM