Pankaja Munde : मुंडेंनी काढली जेलमधल्या कराडची आठवण अन् पंकजाताई म्हणाल्या…गव्हाबाहेर किडेही रगडले जातात!
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्याच्या टोळीने देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली होती. पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी मागितल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा क्रूर व्यक्तीबद्दल धनंजय मुंडे यांनी कळवळा व्यक्त केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही वाटत नाही का, अशी टीकाही त्यांच्यावर होत […]
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्याच्या टोळीने देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली होती. पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी मागितल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा क्रूर व्यक्तीबद्दल धनंजय मुंडे यांनी कळवळा व्यक्त केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही वाटत नाही का, अशी टीकाही त्यांच्यावर होत आहे. “संतोषभाईंइतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला टोचणी भासते तर त्या धन्याइतका दुसरा नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही,” असे म्हणत एका अज्ञात व्यक्तीने धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तीला किती दिवस पाठीशी घालायचे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही एका कार्यक्रमात, “आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली, तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये पिसला जातो. गव्हाबरोबर किडे रगडले जातात,” असे वक्तव्य केले. हे वक्तव्य त्यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आले आहे, अशी चर्चा आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

