अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्… लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं भयंकर कांड ! असं फुटलं बिंग
धाराशिव शहरातील भाग्यनगर परिसरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या शिवराज पाटील यांची लग्नानंतर अवघ्या 30 दिवसांत मोठी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
धाराशिव शहरातील भाग्यनगर परिसरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या शिवराज पाटील यांची लग्नानंतर अवघ्या 30 दिवसांत मोठी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी शुभांगी उर्फ साक्षी वारले हिने साथीदारांच्या मदतीने घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण ऐवजाची किंमत सुमारे 27.54 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी पत्नीसह एकूण 9 जणांविरुद्ध धाराशिवच्या आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घरात विसरलेला मोबाईल या प्रकरणातील महत्त्वाचा धागा ठरला. त्या मोबाईलमध्ये संबंधित महिलेचे इतर व्यक्तींशी विवाह झाल्याची छायाचित्रे आणि काही चॅट्स आढळल्याचा दावा पती शिवराज पाटील यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published on: Jun 13, 2026 03:29 PM
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम

