धाराशिवमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्याकडून पाहणी; बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत
Dharashiv Unseasonal Rain Loss : धाराशिव आणि उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झालंय. या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. पाहा व्हीडिओ...
धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा इथल्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकरी शिवाजी सुरवसे आणि सीताबाई सुरवसे यांची ही बाग होती. त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वाडी बामणी इथे गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील 71 गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आज तिसऱ्या दिवशीही महसूल आणि कृषी विभागाचे पंचनामे सुरु आहेत. पावसाचा 71 गावांना फटका बसला आहे. तर 38 घरांची पडझड झाली आहे. या सगळ्यात 3 नागरिक जखमी झाले आहेत. सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

