Video : जालन्यानंतर आता धुळ्यातील मारुती टार्गेट! मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा चोरल्यानं खळबळ

Dhule Hanuman Temple : हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरणाऱ्या चोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दरम्यान जालन्यातील मूर्ती चोरी प्रकरणीही अजूनही तपास सुरु आहे. जालन्यातील प्राचीन मूर्तीचा चोरी वाद एकीकडे चर्चेत असतानाच दुसरीकडे आता धुळ्यातील मंदिरातही चोरी झाली असल्यानं राजकारणही तापण्याची शक्यता आहे.

विशाल ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 16, 2022 | 9:50 AM

धुळे : धुळ्यातील (Dhule Crime News) मोगराई परिसरात हनुमान मंदिरात (Dhule Mograi Hanuman Temple) चोरीची घटना घडलीय. चोरांनी चक्क हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा (Silver) डोळा चोरलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, शिवसेनेनं चोरीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जालन्यातील मंदिरातूनही प्राचीन मूर्ती चोरीला गेली असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता धुळ्यातही हनुमानाच्या मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यावर चोरांनी डल्ला मारल्यानं खळबळ माजली आहे. पोलिसांकडून आता अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे. स्थानिकांच्या चौकशीतून माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत. हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरणाऱ्या चोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दरम्यान जालन्यातील मूर्ती चोरी प्रकरणी अजूनही तपास सुरु आहे. जालन्यातील प्राचीन मूर्तीच्या चोरीचा वाद एकीकडे चर्चेत असतानाच, दुसरीकडे आता धुळ्यातील मंदिरातही चोरी झाली असल्यानं राजकारणदेखील तापण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरु लागलीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें