Saif Ali Khan Attacked Video : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'

Saif Ali Khan Attacked Video : ‘सैफवर जीवघेणा हल्ला तर ‘तो’ इतका फिट कसा?’

| Updated on: Jan 23, 2025 | 11:21 AM

सैफअली खानसोबत नेमकं काय घडलं हे त्याच्या परिवाराने एकदा सांगायला हवं, कारण हा खासगी प्रश्न नव्हे तर मुंबईतील सुरक्षेच्या प्रश्न आहे, असं म्हणत संजय निरूपम यांनी या घटनेनंतर एक मोठी शंका उपस्थित केली आहे.

जीवघेणा हल्ला झाल्यानंतर अभिनेता सैफ अली खान चाहत्यांना हात दाखवत रुग्णालयातून घरी परतला. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नव्हता. ना मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या चालण्या-बोलण्यातून थकवा जाणवत होता, यावरूनच सत्ताधारी शिंदेंच्या शिवेसनेतील नेते संजय निरूपम यांनी मोठी शंका व्यक्त केली आहे. जर पाठीत अडीच इंच पात तुटलं होतं तर फक्त पाच दिवसातच सैफ अली खान इतका फीट होऊन बाहेर कसा पडला? असा सवाल संजय निरूपम यांनी केलाय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सैफच्या रूग्णाल्याबाहेरच्या व्हिडीओवरून विविध चर्चा झडताय. इरवी साधी मानही भरली तरी आपल्या चालण्यात आणि हालचालीत फरक जाणवतो. मात्र सैफच्या मणक्यात गंभीर इजा झाली, सहा तास ऑपरेशन झालं. तरी सैफ इतक्या तंदुरूस्तीने कसा बाहेर पडला? यावरून चर्चा झडताय. कारण सैफवर चाकूचे सहा वार झाले होते. मान-मणक्यावर गंभीर जखमा होत्या. याच हल्ल्यात पाठीच्या मणक्यात घुसलेलं चाकूनचं पात शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलं. इतकंच नाहीतर शरिरावर दोन गंभीर घाव झाले होते. निरूपम यांनी पोलीस तपासावर शंका उपस्थित केली नसली तरी असा कोणता चोर होता जो हल्ला करून निघून गेला. यावर प्रश्न केलाय?

Published on: Jan 23, 2025 11:21 AM