Disha Salian Case : लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..; मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?
Disha Salian Case Malvani Police Closer report : दिशा सालियान हिने आर्थिक अडचण आणि वडिलांचे विवाहबाह्य संबंध यामुळे स्वत:ला संपवल्याचं मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हंटलेलं आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आता एक नवा अँगल समोर आला आहे. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकेलेली होती. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल दिशाने मित्राना देखील सांगितलेलं होतं. याच गोष्टीमुळे तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे. दिशाचा प्रियकर रोहन राय, मित्र-मैत्रिणी आणि आई-वडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. प्रोजेक्टमध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांचं अफेअर यामुळे ती तणावात होती. मालवणी पोलिसांच्या आधीच्या रिपोर्टमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

