AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nilesh Lanke | बारामतीचा गड उदध्वस्त करणे इतकं सोप्पं वाटंत का? आमदार निलेश लंके यांचा टोला

Nilesh Lanke | बारामतीचा गड उदध्वस्त करणे इतकं सोप्पं वाटंत का? आमदार निलेश लंके यांचा टोला

| Updated on: Sep 07, 2022 | 3:59 PM
Share

Nilesh Lanke | बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतकं सोप्पं वाटंत का, असा सवाल आमदार निलेश लंके यांनी विचारला आहे.

Nilesh Lanke | वक्तव्य करणं सोप्प असतं. पण प्रत्यक्षात कृती करणं सोप का नाही. बारामतीचा गड उदध्वस्त करणे इतके सोप्प काम नाही, असा खरपूस समाचार आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी घेतला आहे. बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामतीचा पॅटर्न तयार झाला आहे. या पवार कुटुंबियांची बारामती आहे. त्यांनी सर्व समाज घटकांसाठी काम केल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी काही नेते असा केविलवाणा प्रयोग राबवत असल्याचा टोलाही लंके यांनी लगावला. लंके आज कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते. लंके यांनी कोरोना काळात (Corona Period) मोठे मदत कार्य उभारले होते. त्यांच्या कार्याची राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती.

Published on: Sep 07, 2022 03:15 PM