Narayan Rane | आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का ? नारायण राणेंचा सवाल
आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) आवाज मांजरीसारखा आहे का, शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मांजरीसारख्या आवाजावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे भडकले.
आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) आवाज मांजरीसारखा आहे का, शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मांजरीसारख्या आवाजावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे भडकले. तसेच शिवसेना नितेश राणेंना अटक करण्यासाठी सूडभावनेने वागत असल्याचा आरोपही नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढतं? ज्यामुळे चिडले. आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा, असा सवाल नारायण राणे यांनी केला.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

