ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड

ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्याच्या समर्थनात मी राहणार आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे.

मुंबई :  राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापाला आहे, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश रद्द केला आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण सुरू झालं, भाजप आणि महविकास आघाडीत इंपेरिकल डेटावरून टोलवाटोलवी होताना पहायला मिळाली. राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत असल्याने निश्चितच त्याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे, जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI