Sambhajinagar : विद्यापीठाच्या उपकुलसचिवांवर स्वतःचं दालन झाडण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुलसचिव हेमलता ठाकरे यांना, विनंती करूनही शिपाई न दिल्याने स्वत:चं कार्यालय स्वत:च झाडण्याची वेळ आली आहे. तसंच कार्यालयातील दस्तऐवज व साहित्य स्वतः डोक्यावर वाहून नवीन विभागात हलवावे लागले. हा प्रकार 24 जून मंगळवार रोजी घडला असून विद्यापीठ प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हेमलता ठाकरे यांचा ऑफिसचे दप्तर चक्क डोक्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात हेमलता ठाकरे यांनी महिला आयोगात आणि मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात तक्रार केली आहे.
हेमलता ठाकरे यांची परीक्षा व मूल्यमापन विभागातून मुख्य प्रशासकीय इमारतीतील अभ्यासक्रम विभागात बदली करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या जुन्या दालनातील कागदपत्रे आणि सामान अभ्यासक्रम विभागात नेण्यासाठी शिपाई मिळावा, अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र, त्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने, तसेच नोटिसीत नमूद मुदतीआधी दालन रिकामे करण्याच्या दबावामुळे, ऑफिसचे दप्तर स्वतः वाहून मुख्य प्रशासकीय इमारतीत नेण्याची वेळ हेमलता ठाकरे यांच्यावर ओढावली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

