अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने टोल नाकाच फोडला; पोलिसांची मोठी कारवाई!
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला.या घटनेनंतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक, 24 जुलै 2023 | मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नरकडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला. गोंदे फाटा येथील टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.या घटनेनंतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करणार यासाठी पाहा हा व्हिडीओ…
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

