विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्ष उमेदवारांनी वाढवली प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी

राज्यातील अनेक मतदारसंघात नामसाधर्म्य असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. तर ज्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत त्यांची देखील आता मनधरणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोण-कोणत्या मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार उभेत पाहूया....

विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्ष उमेदवारांनी वाढवली प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी
| Updated on: Oct 31, 2024 | 11:24 AM

नाशिकच्या नांदगावात शिंदे गटाचे सुहास कांदे विरुद्ध ठाकरे गटाचे गणेश धात्रक विरुद्ध महायुतीचे बंडखोर अपक्ष समीर भुजबळ आहेत. पण सुहास कांदेंविरोधात एका दुसऱ्या सुहास बाबुराव कांदे नावाच्या इसमाने अपक्ष अर्ज भरलाय. ते सुहास बाबुराव कांदे हे मूळ धाराशीवचे आहेत. यानंतर लगेच ठाकरे गटाच्या गणेश धात्रकांविरोधात अजून एका गणेश धात्रक नावाच्या व्यक्तीचाही अर्ज आलाय. त्यामुळे नांदगावात आता दोन सुहास कांदे, दोन गणेश धात्रक उमेदवार असणार आहेत. कांदेंच्या आरोपांनुसार फक्त मतदारांध्ये संभ्रम पसरवण्यासाठी मंत्री छगन भुजबळांनी सदर व्यक्तीला उभं केलंय. समीर भुजबळ काल धाराशीवच्या सुहास कांदेंना घेवून उमेदवारी भरण्यासाठी पोहोचले. त्यावेळी सुहास कांदेंचे समर्थक कार्यालयाबाहेर जमले होते .डमी सुहास कांदेंनी अर्ज भरल्यानंतर समीर भुजबळ त्यांना घेवून बाहेर पडले आणि त्यांना आपल्या गाडीत बसवून निघूनही गेले.

छगन भुजबळांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेला डमी उमेदवारांचा भगरे पॅटर्न सुरु झाल्याचं म्हटलंय. तो भगरे पॅटर्न म्हणजे लोकसभेला दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर गुरुजींविरोधात भाजपच्या भारती पवार उभ्या होत्या. पण इथंच भास्कर बाबू भगरे नावाचे अपक्ष उभे राहिले. पवार गटाच्या भगरेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसऱ्या भास्कर भगरेंना चिन्ह मिळालं तुतारी. शरद पवार गटाचे भगरे हे पेशानं शिक्षक असल्यामुळे त्यांना भगरे सर म्हणून लोक ओळखतात. पण इयत्ता तिसरी शिकलेल्या दुसऱ्या भरगेंच्या विनंतीमुळे निवडणूक आयोगानं त्यांच्या नावापुढे ‘सर’ हे टोपणनाव देण्याचं मान्य केलं. भास्कर भगरे १ लाख १३ हजार मतांनी विजयी झाले खरे पण तुतारी चिन्हावर लढलेल्या दुसऱ्या भास्कर बाबू भगरेंनीही १ लाख ३ हजार मतं पदरात पाडून घेतली. आणखी कोणकोणत्या ठिकाणी डमी उमेदवार बघा व्हिडीओ

Follow us
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.