आजपासून न्यायालयांमध्ये ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात
वकील मंडळींना, पक्षकारांना अनेक वेळा न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असते. न्यायाधिशांचे खडे बोल ही ऐकावे लागतात.
मुंबई : आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. याचे कारण न्यायालयिन किचकट पद्धत. एखादा अर्ज जरी द्यायाचा असेल तर त्याला लागणारा वेळ. यावर आता न्यायव्यवस्थेनेच चांगला उपाय केला आहे. आता वकील मंडळींना, पक्षकारांना घरबसल्या त्यांची त्यांची प्रकरणे न्यायालयात दाखल करता येणार आहे.
वकील मंडळींना, पक्षकारांना अनेक वेळा न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असते. न्यायाधिशांचे खडे बोल ही ऐकावे लागतात.
पण आता वकील मंडळींना, पक्षकारांना घरबसल्या प्रकरणे न्यायालयात दाखल करता येतील. आज पासून न्यायालयांमध्ये ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल. ई-फायलिंग या प्रणालीचा बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
