आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी मिळणार?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांसाठी दिलासादायक. राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघातील आमदारांना आपल्या आपल्या मतदारसंघातील विकास करण्यासाठी मोठा निधी
मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघातील आमदारांना आपल्या आपल्या मतदारसंघातील विकास करण्यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. या विकास कामांसाठी महायुतीच्या आमदारांना भरघोस निधींचं वाटप करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी आमदारांना भरमसाठ निधीची खैरात करण्यात आली आहे. महायुतीमधील प्रत्येक आमदाराला किमान 40 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीच्या आमदारांना किती निधी देण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Latest Videos
Latest News