Madhuri Elephant : नांदणी मठातील ‘माधुरी’साठी धडपड अन् प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी, लाडकी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? प्रकरण नेमकं काय?
माधुरी हत्तीणीला पुन्हा परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आता हालचाल करतना दिसताहेत. यासंदर्भात कोल्हापूरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीमध्ये वनताराचे सीईओ देखील उपस्थित होते. नेमकं काय घडलं या बैठकीत पाहूयात.
गेल्या अनेक दिवसांपासून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला कोल्हापूरातल्या मठात ठेवण्यासाठी लोकभावनेतून मागणी होत आहे. स्थानिकांनी हत्तीण परत यावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली. स्वाक्षरी मोहीम सुद्धा झाली. आता या हत्तीणीसाठी थेट वनताराचे सीईओ विहान यांनी कोल्हापूर गाठले आहे. कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराच्या सीईओ सोबत बैठक पार पडली आहे. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हणत प्रकाश आबिटकरांनी सकारात्मकता दाखवली आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आलं. यावेळेला हत्तीणीला निरोप देताना लहानपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली होती. तर हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली होती. हे संपूर्ण प्रकरण काय ते बघा स्पेशल रिपोर्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

