AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ब्रेक फेल... कंटेनरनं 15-16 वाहनं उडवली, 8 जणांचा मृत्यू, संतप्त पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन

Pune : ब्रेक फेल… कंटेनरनं 15-16 वाहनं उडवली, 8 जणांचा मृत्यू, संतप्त पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन

| Updated on: Nov 15, 2025 | 3:54 PM
Share

पुण्यातल्या नवले ब्रिज जवळ झालेल्या अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी आज थेट महामार्गावरती तिरडी आंदोलन केलेलं आहे.

पुण्यातल्या नवले ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणेकर नागरिक संतप्त झाले आहेत. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी आज थेट महामार्गावर तिरडी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. पुणे-बंगळूरू महामार्गाचा नवले ब्रिज परिसर आता डेथ स्पॉट बनल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नव्या कात्रज बोगद्यापासून वडगाव ब्रिजपर्यंतचा हा रस्ता तीव्र उताराचा असून, रस्त्याची रचना चुकीची असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. उतारावर अवजड वाहनांचे ब्रेक फेल झाल्यास अपघाताची शक्यता वाढते. उपाययोजना म्हणून या रस्त्यावर रम्बलर्स बसवण्यात आले आहेत, तर कारसाठी ६० किलोमीटर आणि अवजड वाहनांसाठी त्यापेक्षाही कमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रस्त्यावर पूर्णपणे स्पीड कॅमेरे बसवले असले तरी, वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.

नवले पुलाजवळ झालेला अपघात हा ब्रेक फेल झालेल्या कंटेनरमुळेच झाला असून कंटेनरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे अनेक वाहने महामार्गावर आडवी झाली, तर काही सर्व्हिस रस्त्यावर जाऊन उलटी झाल्याची माहिती मिळतेय.

Published on: Nov 15, 2025 03:53 PM